परभणी : पूर्णा शहरात पोलिसांचा रूट मार्च
परभणी, 19 सप्टेंबर (हिं.स.)। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पूर्णा शहरात पोलिसांचा रूट मार्च काढण्यात आला. उपविभागीय पोलिस अधिकारी कुंदनकुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या मार्चमध्ये पोलीस निरीक्
Q


परभणी, 19 सप्टेंबर (हिं.स.)। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पूर्णा शहरात पोलिसांचा रूट मार्च काढण्यात आला. उपविभागीय पोलिस अधिकारी कुंदनकुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या मार्चमध्ये पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे यांच्यासह पूर्णा, पालम, चुडावा पोलिस ठाण्यांचे अधिकारी - कर्मचारी, एसआरपीएफ व होमगार्ड सहभागी झाले. या रूट मार्चमध्ये ९ अधिकारी, ११७ पोलिस कर्मचारी व ६५ होमगार्ड सहभागी झाले होते. शहरातील प्रमुख मार्गांवरून संचलन करत पोलिसांनी नागरिकांना सुरक्षिततेचा संदेश दिला. गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी नागरिकांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande