परभणी : दुष्काळसदृश स्थितीत विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करण्याची मागणी
परभणी, 19 सप्टेंबर (हिं.स.)। मराठवाड्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतकरी आणि शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांसमोर गंभीर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. अनेक भागांत ३० ते ४० दिवसांपेक्षा अधिक काळ पाऊस न झाल्याने शेती पिकांवर मोठा परिण
Q


परभणी, 19 सप्टेंबर (हिं.स.)। मराठवाड्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतकरी आणि शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांसमोर गंभीर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. अनेक भागांत ३० ते ४० दिवसांपेक्षा अधिक काळ पाऊस न झाल्याने शेती पिकांवर मोठा परिणाम झाला असून शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व परीक्षा शुल्क माफ करावे, प्रलंबित शिष्यवृत्ती तात्काळ जमा करावी तसेच डॉ. पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता पात्र विद्यार्थ्यांच्या खात्यावर वर्ग करावा, या मागण्यांसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद परभणी महानगरच्या वतीने अपर जिल्हाधिकारी शोभादेवी जाधव यांच्यामार्फत मुख्यमंत्री महोदयांना निवेदन देण्यात आले.

महाविद्यालयीन शिक्षण, परीक्षा शुल्क, वसतिगृह, पुस्तके, प्रवास व इतर शैक्षणिक खर्चाचा भार पालकांवर पडत आहे. आर्थिक परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण खंडित होऊ नये, यासाठी शासनाने तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी अभाविपने केली. निवेदनात, शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व परीक्षा शुल्क माफ करणे, प्रलंबित शिष्यवृत्ती तात्काळ वितरित करणे, डॉ. पंजाबराव देशमुख निर्वाह भत्त्याची प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे, शिष्यवृत्ती व निर्वाह भत्ता वितरणातील प्रशासकीय आणि तांत्रिक अडचणी दूर करणे तसेच दुष्काळसदृश परिस्थितीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष शैक्षणिक मदत उपलब्ध करून देणे यांचा समावेश आहे.

शिष्यवृत्ती व निर्वाह भत्त्याच्या प्रलंबित प्रकरणांचा जिल्हानिहाय आढावा घेऊन त्यांचा कालबद्ध पद्धतीने निपटारा करावा, तसेच संबंधित महाविद्यालये व शासकीय विभागांना आवश्यक निर्देश देऊन विद्यार्थ्यांना तातडीने दिलासा द्यावा, अशी मागणी अभाविपच्या वतीने करण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande