सराफा बाजारात सोन्याच्या दरात वाढ; चेन्नईत मात्र भाव घसरले, चांदी स्थिर
नवी दिल्ली, 24 सप्टेंबर (हि.स.)। देशांतर्गत सराफा बाजारात आज सुरुवातीच्या व्यवहारात चेन्नई वगळता बहुतांश प्रमुख सराफा बाजारांमध्ये सोन्याच्या दरात तेजीचा कल दिसून आला. मात्र, चेन्नईमध्ये सोन्याच्या दरात घसरण नोंदवण्यात आली. दुसरीकडे, चांदीच्या दरात
सोने-चांदी लोगो


नवी दिल्ली, 24 सप्टेंबर (हि.स.)। देशांतर्गत सराफा बाजारात आज सुरुवातीच्या व्यवहारात चेन्नई वगळता बहुतांश प्रमुख सराफा बाजारांमध्ये सोन्याच्या दरात तेजीचा कल दिसून आला. मात्र, चेन्नईमध्ये सोन्याच्या दरात घसरण नोंदवण्यात आली. दुसरीकडे, चांदीच्या दरात आज सलग दुसऱ्या दिवशी कोणताही बदल झालेला नाही.

सोन्याच्या दरात झालेल्या बदलामुळे चेन्नई वगळता देशातील बहुतांश सराफा बाजारांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 970 ते 1,040 रुपयांनी वाढला आहे. त्याचवेळी चेन्नईमध्ये सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम 500 ते 550 रुपयांची घसरण झाली आहे.

या दरबदलामुळे देशातील बहुतांश सराफा बाजारांमध्ये आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,54,190 ते 1,54,360 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,41,340 ते 1,41,510 रुपये प्रति 10 ग्रॅम या दरम्यान आहे. चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नसल्याने दिल्लीच्या सराफा बाजारात चांदी आजही 2,49,900 रुपये प्रति किलोग्रॅम या दराने विकली जात आहे.

प्रमुख शहरांमधील सोन्याचे दर

राजधानी दिल्लीत आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,54,360 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,41,510 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

देशाची आर्थिक राजधानी मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,54,210 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,41,360 रुपये प्रति 10 ग्रॅम नोंदवला गेला. अहमदाबादमध्ये 24 कॅरेट सोन्याचा किरकोळ भाव 1,54,260 रुपये, तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,41,410 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चेन्नईमध्ये आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,54,190 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,41,340 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. कोलकात्यात 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,54,210 रुपये, तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,41,360 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

भोपाळमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 1,54,260 रुपये, तर 22 कॅरेट सोन्याचा दर 1,41,410 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. जयपूरमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,54,360 रुपये, तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,41,510 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

पाटण्यात 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,54,260 रुपये, तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,41,410 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. लखनऊच्या सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,54,360 रुपये, तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,41,510 रुपये प्रति 10 ग्रॅम नोंदवला गेला.

दक्षिण आणि पूर्व भारतातील बाजार

देशातील इतर राज्यांप्रमाणेच कर्नाटक, तेलंगणा आणि ओडिशातील सराफा बाजारांमध्येही आज सुरुवातीच्या व्यवहारात सोन्याच्या दरात वाढ झाली. या तीन राज्यांच्या राजधानी अनुक्रमे बंगळुरू, हैदराबाद आणि भुवनेश्वर येथे 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,54,210 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

त्याचप्रमाणे या तिन्ही शहरांमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,41,360 रुपये प्रति 10 ग्रॅम या पातळीवर व्यवहार करत आहे.-------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande