जागतिक बाजारात दबाव; अमेरिकेसह आशियाई बाजारातही घसरण
नवी दिल्ली, 24 सप्टेंबर (हि.स.)। जागतिक बाजारातून आज कमकुवत संकेत मिळत आहेत. मागील सत्रात अमेरिकी बाजार घसरणीसह बंद झाले. डाऊ जोन्स फ्युचर्समध्येही आज कमजोरी दिसून येत आहे. युरोपीय बाजारांमध्ये मागील सत्रात सातत्याने दबाव कायम राहिला. त्याचप्रमाणे
आशिया बाजार लोगो


नवी दिल्ली, 24 सप्टेंबर (हि.स.)। जागतिक बाजारातून आज कमकुवत संकेत मिळत आहेत. मागील सत्रात अमेरिकी बाजार घसरणीसह बंद झाले. डाऊ जोन्स फ्युचर्समध्येही आज कमजोरी दिसून येत आहे. युरोपीय बाजारांमध्ये मागील सत्रात सातत्याने दबाव कायम राहिला. त्याचप्रमाणे आशियाई बाजारांमध्येही आज बहुतांश ठिकाणी विक्रीचा दबाव दिसून येत आहे.

बॉन्ड यिल्डमध्ये झालेल्या वाढीमुळे मागील सत्रात अमेरिकी बाजारात सातत्याने विक्री झाली. संपूर्ण सत्रात दबावाखाली व्यवहार केल्यानंतर डाऊ जोन्स इंडस्ट्रियल ऍव्हरेजमध्ये 0.70 टक्क्यांची घसरण झाली. त्याचप्रमाणे एस अँड पी 500 निर्देशांक 0.75 टक्क्यांच्या घसरणीसह 7,706.39 अंकांवर बंद झाला. नॅस्डॅकमध्ये 308.24 अंक म्हणजेच 1.13 टक्क्यांची घसरण होऊन तो 26,936.04 अंकांवर बंद झाला.दरम्यान, डाऊ जोन्स फ्युचर्समध्ये आज सध्या 91.97 अंक म्हणजेच 0.18 टक्क्यांची घसरण असून तो 51,419.62 अंकांवर व्यवहार करत आहे.

युरोपीय बाजारांमध्येही विक्रीचा दबाव

अमेरिकी बाजाराप्रमाणेच युरोपीय बाजारांमध्येही मागील सत्रात सातत्याने विक्रीचा दबाव राहिला. एफटीएसई निर्देशांक 0.03 टक्क्यांच्या किरकोळ घसरणीसह 10,705.26 अंकांवर बंद झाला.त्याचप्रमाणे सीएसी निर्देशांक 0.39 टक्क्यांनी घसरून 8,123.41 अंकांवर बंद झाला. डीएएक्स निर्देशांक 168.22 अंक म्हणजेच 0.66 टक्क्यांनी घसरून 25,410.63 अंकांवर मागील सत्रातील व्यवहाराचा शेवट झाला.

आशियाई बाजारातही विक्रीचे वर्चस्व

आशियाई बाजारांमध्येही आज बहुतांश ठिकाणी विक्रीचा दबाव कायम आहे. आशियातील नऊ प्रमुख बाजारांपैकी सात निर्देशांक घसरणीसह लाल निशाणावर, तर एक निर्देशांक वाढीसह हिरव्या निशाणावर व्यवहार करत आहे.दक्षिण कोरियाच्या शेअर बाजारात हार्वेस्ट फेस्टिव्हल चुसोकच्या सुट्टीमुळे आज कोस्पी निर्देशांकात कोणताही व्यवहार होत नाही.आशियाई बाजारांमध्ये सध्या निक्केई निर्देशांक एकमेव प्रमुख निर्देशांक असून तो 646.05 अंक म्हणजेच 0.99 टक्क्यांच्या वाढीसह 65,665 अंकांवर व्यवहार करत आहे.

दुसरीकडे, गिफ्ट निफ्टी 211.50 अंक म्हणजेच 0.90 टक्क्यांनी घसरून 23,234 अंकांवर व्यवहार करत आहे. जकार्ता कंपोझिट निर्देशांकातही 0.90 टक्क्यांची घसरण झाली असून तो 6,317.53 अंकांवर पोहोचला आहे.शांघाय कंपोझिट निर्देशांकावरही दबाव कायम असून तो सध्या 0.93 टक्क्यांनी घसरून 3,900 अंकांच्या पातळीवर आला आहे.त्याचप्रमाणे हँग सेंग निर्देशांक 143.12 अंक म्हणजेच 0.58 टक्क्यांनी घसरून 24,691 अंकांवर व्यवहार करत आहे. तैवान वेटेड निर्देशांक 173.45 अंक म्हणजेच 0.36 टक्क्यांनी घसरून 47,983.84 अंकांवर आला आहे.याशिवाय सेट कंपोझिट निर्देशांक 0.25 टक्क्यांच्या घसरणीसह 1,606.69 अंकांवर, तर स्ट्रेट्स टाइम्स निर्देशांक 0.15 टक्क्यांच्या घसरणीसह 5,702.18 अंकांवर व्यवहार करत आहेत.-------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande