रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर राजापूरनजीक कंटेनर उलटला
रत्नागिरी, 25 सप्टेंबर (हिं.स.) । मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर कोदवली (ता. राजापूर) येथे आज सकाळी ११ वाजता कंटेनर उलटून अपघात झाला. मात्र त्यात चालकाला किरकोळ जखमी झाला.मुंबईहून गोव्याच्या दिशेने माल वाहतूक कंटेनर (क्र. एमएच 04 जेके 7039) कोदवल
रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर राजापूरनजीक कंटेनर उलटला


रत्नागिरी, 25 सप्टेंबर (हिं.स.) । मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर कोदवली (ता. राजापूर) येथे आज सकाळी ११ वाजता कंटेनर उलटून अपघात झाला. मात्र त्यात चालकाला किरकोळ जखमी झाला.मुंबईहून गोव्याच्या दिशेने माल वाहतूक कंटेनर (क्र. एमएच 04 जेके 7039) कोदवलीनजीक भागात डिव्हायडरला आदळून उलटला. अपघाताची घटना समजताच राजापूर पोलीस घटनास्थळी पोचले आणि त्यांनी पाहणी केली. कंटेनर चालकाला थोडीफार दुखापत झाली असल्याने त्याला राजापूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातात कुठलीही जीवितहानी झालेली नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande