उत्तर महाराष्ट्रातील यकृत रुग्णांना मिळाले नवे जीवन
नाशिक, 25 सप्टेंबर (हिं.स.)। यकृताच्या गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांना वेळेत उपचार आणि यकृत प्रत्यारोपणाची सुविधा मिळावी, यासाठी नाशिकमधील मेडिलिव्ह हॉस्पिटल आणि नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या
Liver patients in North Maharashtra


नाशिक, 25 सप्टेंबर (हिं.स.)।

यकृताच्या गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांना वेळेत उपचार आणि यकृत प्रत्यारोपणाची सुविधा मिळावी, यासाठी नाशिकमधील मेडिलिव्ह हॉस्पिटल आणि नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत उत्तर महाराष्ट्रातील अनेक रुग्णांवर अपोलो हॉस्पिटलमध्ये यशस्वी यकृत प्रत्यारोपण करण्यात आले.

यकृतविकाराचे लवकर निदान होऊन योग्य वेळी उपचार मिळणे महत्त्वाचे आहे. आजार गंभीर झाल्यास योग्य वेळी केलेले यकृत प्रत्यारोपण रुग्णाचे प्राण वाचवू शकते. नाशिकमध्ये उपचार सुरू ठेवत, आवश्यकतेनुसार नवी मुंबई येथे प्रगत प्रत्यारोपणाची सुविधा उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे मेडिलिव्ह हॉस्पिटलचे डॉ. शरद देशमुख म्हणाले.

अपोलो हॉस्पिटल्स, नवी मुंबईचे मुख्य यकृत प्रत्यारोपण शल्यचिकित्सक डॉ. गुरुप्रसाद शेट्टी यांनी सांगितले की, रुग्णाला रेफर करणे ही केवळ रुग्णाच्या स्थलांतराची प्रक्रिया नसून, संबंधित डॉक्टर आणि प्रत्यारोपण टीममधील समन्वयाची सुरुवात आहे. रुग्णाची वैद्यकीय स्थिती, प्रत्यारोपणासाठीची पात्रता तसेच दात्याची प्रक्रिया याबाबत आवश्यक मार्गदर्शन केले जाते.

अपोलो हॉस्पिटल्स, नवी मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण शिंगोटे यांनी गंभीर आजारांमध्ये विविध तज्ज्ञ आणि हॉस्पिटल्सच्या समन्वयाचे महत्त्व अधोरेखित केले.

गेल्या वर्षभरात मेडिलिव्ह हॉस्पिटलमध्ये उपचार घेतलेल्या गंभीर यकृतविकाराच्या अनेक रुग्णांवर अपोलो हॉस्पिटलमध्ये यकृत प्रत्यारोपण करण्यात आले. रुग्णांना वैद्यकीय उपचारांसोबतच दाता शोधणे, प्रत्यारोपणाची प्रक्रिया आणि आर्थिक नियोजनाबाबतही मार्गदर्शन मिळाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande