
नाशिक, 25 सप्टेंबर (हिं.स.)। शेतजमिनीच्या खरेदी दस्ताची नोंदणी करून देण्यासाठी वकिलाकडे १० हजार रुपयांची लाच मागून तडजोडीनंतर ४२०० रुपये स्वीकारल्याप्रकरणी दुय्यम निबंधकासह एका खासगी इसमाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक पथकाने गुरुवारी (दि. २४) ताब्यात घेतले. प्रमोद लक्ष्मण वामन (वय ५७, दुय्यमनिबंधक वर्ग - २, नाशिक-४) आणि योगेश बाळू डांगले (वय ३८, रा. पिंपळास रामाचे, ता. निफाड, जि. नाशिक) अशी त्यांची नावे आहेत.
तक्रारदार वकील असून, त्यांच्या पक्षकाराच्या शेतजमिनीच्या खरेदी दस्ताची नोंदणी करून देण्यासाठी दुय्यम निबंधक प्रमोद वामन यांनी तक्रारदाराकडे १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याची तक्रार २४ सप्टेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे होती. करण्यात आली
तक्रारीच्या अनुषंगाने गुरुवारी दुपारी ४.२३ ते सायंकाळी ५.२० या वेळेत पंचांसमक्ष पडताळणी करण्यात आली. त्यावेळी वामन यांनी स्वतःसाठी तसेच खासगी इसम योगेश डांगले याच्यासाठी सुरुवातीला १० हजार रुपयांची लाच मागितली. त्यानंतर तडजोड होऊन पाच हजार रुपये आणि पुन्हा तडजोडीनंतर ४२०० रुपये स्वीकारण्याचे मान्य करण्यात आले.
वामन यांच्या सांगण्यावरून डांगले याने तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवली. लाच मागणीस प्रोत्साहन दिल्याचे एसीबीच्या कारवाईत नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक ४, येथे डांगले याने वामन यांच्या सांगण्यावरून तक्रारदाराकडून ४२०० रुपयांची लाचेची रक्कम पंचांसमक्ष स्वीकारली. त्यानंतर दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाणे, येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाच्या कलम अन्वये गुन्हा दाखल करण्याची करण्यात आला आहे .
ही कारवाई पोलीस निरीक्षक विकास शिवाजी लोंढे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार प्रभाकर गवळी, पोलीस अंमलदार किरण धुळे, सुरेश चव्हाण आणि नितीन नेटारे यांच्या पथकाने केली . पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे आणि अपर पोलीस अधीक्षक कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI