
बीड, 25 सप्टेंबर (हिं.स.)। जिल्हा नियोजन समितीअंतर्गत रस्ता सुरक्षा उपाययोजनांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तीनही विभागांना प्रत्येकी १ कोटी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या तिन्ही कामांना सुरुवात झाली असून ती प्रगतीपथावर असल्याची माहिती संबंधित विभागांनी दिली.
तर बीड जिल्ह्यातील विविध राष्ट्रीय महामार्गांवर वाहनचालकांसाठी गतीप्रदर्शन फलक बसविण्यासाठी २.३० कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. फलकांसाठीची ठिकाणे निश्चित झाली असून लवकरच काम सुरू करण्यात येणार आहे.
-------------------------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis