छ. संभाजीनगर - रावसाहेब दानवे यांनी केली शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी
छत्रपती संभाजीनगर, 25 सप्टेंबर, (हिं.स.)। भारतीय जनता पक्षाचे नेते माजी मंत्री रावसाहेब दानवे यांनी मालखेडा, ता. भोकरदन येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली मालखेडा, ता. भोकरदन येथे आज प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाह
अ


छत्रपती संभाजीनगर, 25 सप्टेंबर, (हिं.स.)। भारतीय जनता पक्षाचे नेते माजी मंत्री रावसाहेब दानवे यांनी मालखेडा, ता. भोकरदन येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली

मालखेडा, ता. भोकरदन येथे आज प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली. यावेळी पावसाअभावी मका पिकाचे अतोनात नुकसान झालेले निदर्शनास आले. पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक खराब झाले असून शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे.

शेतकऱ्यांची ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक असून त्यांचा हा प्रश्न शासन दरबारी नक्कीच मांडून शेतकऱ्यांना योग्य ती मदत व नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे.

याप्रसंगी परिसरातील शेतकरी बांधव तसेच भाजप नेते गणेश ठाले, शिवाजी घोडके, उत्तम घोडके, पिकारोत रमेश घोडके व इतर शेतकरी बांधव उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande