
छत्रपती संभाजीनगर, 25 सप्टेंबर, (हिं.स.)। दहिगाव, ता. सिल्लोड येथे वीज पडून दुर्दैवी निधन झालेल्या स्व. मनोहर दुधे व स्व. पार्वताबाई दुधे या पती-पत्नीच्या कुटुंबीयांची भाजपाचे वरिष्ठ नेते माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी सांत्वनपर भेट घेतली.
एकाच कुटुंबातील पती-पत्नीचे अशा प्रकारे अकस्मात निधन होणे ही अत्यंत दुःखद व मन हेलावून टाकणारी घटना आहे. या दुःखद प्रसंगी दुधे परिवाराची भेट घेऊन त्यांच्या दुःखात सहभागी झालो तसेच कुटुंबीयांना धीर दिला. असे दानवे यांनी सांगितले
यावेळी भाजप अल्पसंख्यांक महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष इद्रिस मुलतानी, भाजप छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष श्री. सुरेश बनकर, श्री. गणेश ठाले, श्री. भानुदास सेठ सरोदे, श्री. दिलीप काका दाणेकर, श्री. भगवान आहेर, श्री. मच्छिंद्र पालोदकर ,श्री. एकनाथ हिवाळे, श्री. राजकुमार राजपूत, श्री. नारायण खोमणे, श्री. वसंत विसपुते तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.
ईश्वर दिवंगत स्व. मनोहर दुधे व स्व. पार्वताबाई दुधे यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती देवो आणि दुधे परिवारास हे दुःख सहन करण्याची शक्ती व धैर्य देवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. दुःखाच्या या कठीण प्रसंगी दुधे परिवाराच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. असे ते म्हणाले.
.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis