रत्नागिरी : खेड तालुक्यात २८ सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’
रत्नागिरी, 25 सप्टेंबर (हिं.स.) ।विमुक्त व भटक्या जाती-जमाती प्रवर्गातील नागरिकांना विविध शासकीय सेवा सहज उपलब्ध व्हाव्यात, यासाठी खेड तालुक्यात सोमवार, दि. २८ सप्टेंबर रोजी सेवा संकल्प अभियानांतर्गत विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. तालुक्यात
रत्नागिरी : खेड तालुक्यात २८ सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’


रत्नागिरी, 25 सप्टेंबर (हिं.स.) ।विमुक्त व भटक्या जाती-जमाती प्रवर्गातील नागरिकांना विविध शासकीय सेवा सहज उपलब्ध व्हाव्यात, यासाठी खेड तालुक्यात सोमवार, दि. २८ सप्टेंबर रोजी सेवा संकल्प अभियानांतर्गत विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. तालुक्यातील ११ महसूल मंडळांमध्ये सकाळी ११ वाजता एकाच वेळी ही शिबिरे होणार आहेत. अशी माहिती प्रांताधिकारी वैशाली पाटील यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सांविधानिक पदावरील २५ वर्षांच्या कार्यकाळानिमित्त तसेच त्यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या सूचनेनुसार खेड तालुक्यात या अभियानांतर्गत विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरांमध्ये नागरिकांना विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. शालेय विद्यार्थ्यांसाठी आवश्यक विविध दाखले, जात प्रमाणपत्र, नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र, नवीन आधार नोंदणी व आधारमधील दुरुस्ती, नवीन शिधापत्रिका तसेच शिधापत्रिकेतील दुरुस्ती, सातबारा आणि इतर महसूलविषयक सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

नियुक्त महा ई-सेवा व ‘आपले सरकार’ सेवा केंद्र चालकांनी आवश्यक संगणकीय साहित्यांसह निर्धारित वेळेत उपस्थित राहण्याचे निर्देश तहसीलदार सुधार सोनवणे यांनी दिले आहेत. गरजू नागरिक आणि विद्यार्थ्यांनी या विशेष शिबिरांचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande