यूएनजीएमध्ये पाकिस्तान-बांगलादेशची जवळीक; शहबाज शरीफ आणि तारिक रहमान यांची भेट
आल्बनी, 25 सप्टेंबर (हिं.स.)।संयुक्त राष्ट्र महासभेच्या ८१व्या अधिवेशनादरम्यान पाकिस्तान आणि बांगलादेशच्या पंतप्रधानांची भेट झाली. दोन्ही नेत्यांनी उभय देशांमधील संबंध अधिक मजबूत करण्याबाबत चर्चा केली. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी २४ सप्
यूएनजीएमध्ये पाकिस्तान-बांगलादेशची जवळीक; शहबाज शरीफ आणि तारिक रहमान यांची भेट


आल्बनी, 25 सप्टेंबर (हिं.स.)।संयुक्त राष्ट्र महासभेच्या ८१व्या अधिवेशनादरम्यान पाकिस्तान आणि बांगलादेशच्या पंतप्रधानांची भेट झाली. दोन्ही नेत्यांनी उभय देशांमधील संबंध अधिक मजबूत करण्याबाबत चर्चा केली.

पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी २४ सप्टेंबर रोजी न्यूयॉर्कमध्ये बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान यांची भेट घेतली. भेटीनंतर शहबाज शरीफ यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर ही चर्चा मैत्रीपूर्ण आणि सकारात्मक वातावरणात झाल्याचे सांगितले. दोन्ही देशांमधील व्यापार, गुंतवणूक, संपर्कव्यवस्था, शिक्षण, पर्यटन आणि लोकांमधील परस्पर संपर्क अधिक वाढवण्याबाबत सहमती झाल्याचे त्यांनी नमूद केले.दोन्ही नेत्यांनी प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही विचारांची देवाणघेवाण केली. तसेच संयुक्त राष्ट्रांसारख्या बहुपक्षीय मंचांवर दोन्ही देशांमध्ये जवळचा समन्वय कायम ठेवण्याबाबत चर्चा झाली.

बांगलादेशकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, तारिक रहमान यांनी पाकिस्तानसोबतच्या संबंधांच्या सद्यस्थितीबाबत समाधान व्यक्त केले. परस्पर आदर, समजूतदारपणा आणि सहकार्याच्या आधारावर दोन्ही देशांमधील संबंध पुढे नेण्याची गरज असल्याचे दोन्ही नेत्यांनी अधोरेखित केले. तसेच परस्पर हिताच्या मुद्द्यांवर नियमित संवाद आणि संपर्क कायम ठेवण्यावरही भर देण्यात आला. बैठकीदरम्यान दोन्ही देशांमधील सहकार्याच्या संभाव्य क्षेत्रांसोबतच प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींवरही चर्चा करण्यात आली.

संयुक्त राष्ट्र महासभेच्या ८१व्या अधिवेशनाचे अध्यक्षपद स्वीकारल्याबद्दल शहबाज शरीफ यांनी बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री खलीलुर रहमान यांचे अभिनंदन केले. संयुक्त राष्ट्रांच्या उद्दिष्टांना पुढे नेण्यासाठी बांगलादेशकडून करण्यात येणाऱ्या प्रयत्नांना पाकिस्तानचा पाठिंबा असल्याचेही त्यांनी सांगितले. बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री खलीलुर रहमान हे ८१व्या संयुक्त राष्ट्र महासभेचे अध्यक्ष आहेत.

पाकिस्तान आणि बांगलादेशमधील संबंधांमध्ये अलीकडच्या काळात संवाद वाढला आहे. २४ सप्टेंबर रोजी झालेली ही भेटही दोन्ही देशांमधील वाढत्या संवादाच्या पार्श्वभूमीवर झाली. आता व्यापार, गुंतवणूक, प्रवास, शिक्षण आणि इतर क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्याची इच्छा दोन्ही देशांनी व्यक्त केली आहे.

सौदी अरेबिया, पाकिस्तान आणि तुर्किये यांच्यात झालेल्या मक्का संयुक्त संरक्षण कराराबाबत बांगलादेशने सकारात्मक भूमिका घेतली आहे. बांगलादेशचे परराष्ट्र राज्यमंत्री हुमायून कबीर यांनी सांगितले की, या करारात सहभागी होण्यासाठी निमंत्रण मिळाल्यास ढाका त्यावर विचार करेल. मात्र, सध्या बांगलादेशला करारातील विद्यमान सदस्य देशांकडून कोणतेही औपचारिक निमंत्रण मिळालेले नाही.

सौदी अरेबिया, तुर्किये आणि पाकिस्तान यांनी ७ ऑगस्ट २०२६ रोजी मक्का येथे संयुक्त संरक्षण करारावर स्वाक्षरी केली होती. या करारानुसार, सदस्य देशांपैकी एखाद्या देशावर सशस्त्र हल्ला झाल्यास तो तिन्ही देशांवरील हल्ला मानला जाईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande