नेरळच्या कुंभारआळीत ट्रान्सफॉर्मरला अचानक आग; वीजपुरवठा खंडित
रायगड, २६ सप्टेंबर (हिं.स.) | नेरळ : नेरळ येथील कुंभारआळी परिसरातील ३१५ केव्ही ट्रान्सफॉर्मरने अचानक पेट घेतल्याने परिसरात खळबळ उडाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्याने परिसरातील वीजपुरवठा खंडित
315 kV transformer, replaced in June, catches fire again; stir in Kumbhar-ali.


रायगड, २६ सप्टेंबर (हिं.स.) | नेरळ : नेरळ येथील कुंभारआळी परिसरातील ३१५ केव्ही ट्रान्सफॉर्मरने अचानक पेट घेतल्याने परिसरात खळबळ उडाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्याने परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला आणि नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागला.विशेष म्हणजे, संबंधित ट्रान्सफॉर्मर जून महिन्यातच बदलण्यात आला होता. अवघ्या काही महिन्यांत नव्याने बसवलेल्या ट्रान्सफॉर्मरला आग लागल्याने त्याच्या कार्यक्षमतेबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ट्रान्सफॉर्मरला आग लागण्यामागील नेमके कारण शोधून त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

दरम्यान, अधिकारी दिक्षांत वाघ यांनी परिसरात लवकरच नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्यात येणार असल्याची माहिती दिली. त्यामुळे खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत होऊन नागरिकांची गैरसोय दूर होण्याची अपेक्षा आहे.

--------------------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande