‘संकल्प सेवा अभियाना’साठी बीड जिल्हा परिषद सज्ज
बीड, 26 सप्टेंबर (हिं.स.)। महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ अंतर्गत ‘संकल्प सेवा अभियाना’ची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्हा
‘संकल्प सेवा अभियाना’साठी बीड जिल्हा परिषद सज्ज


बीड, 26 सप्टेंबर (हिं.स.)। महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ अंतर्गत ‘संकल्प सेवा अभियाना’ची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्हा परिषदेच्या दालनात मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांच्या अध्यक्षतेखाली सर्व खातेप्रमुख आणि पंचायत विस्तार अधिकाऱ्यांची महत्त्वाची आढावा बैठक पार पडली. या अभियानाद्वारे नागरिकांना विहित वेळेत व पारदर्शक सेवा देण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

शाश्वत विकासाच्या ध्येयाशी निगडित नऊ संकल्पनांवर आधारित या अभियानात विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जाणार आहेत. यामध्ये सेवा सेतू अभियान, सेवा माझे योगदान, विकसित भारत संकल्प यात्रा, सेवा ज्योत यात्रा, चित्रकला व वकृत्व स्पर्धा, अंगणवाडी उत्सव, आशिर्वादाचा दिवा, बदलाची गोष्ट, आभार आणि संकल्पाची रांगोळी, नमो सेवा गाथा तसेच जनसेवक महाकुंभ यांसारख्या कार्यक्रमांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील नागरिकांच्या विविध अडचणी व प्रश्न सोडवण्यासाठी ग्रामपंचायत स्तरापासून जिल्हा स्तरापर्यंतच्या सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वयाने काम करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांनी केले.

नागरिकांच्या सुलभतेसाठी शासनाने उचललेल्या या कल्याणकारी पावलाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी बैठकीत केले. याप्रसंगी पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी किशोर काळे, जिल्हा आरोग्य अधिकारी उल्हास गंडाळ, महिला व बालविकास प्रकल्प विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज ससे यांच्यासह सर्व विभागांचे खातेप्रमुख आणि पंचायत विस्तार अधिकारी उपस्थित होते. बैठकीच्या समारोपप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी किशोर काळे यांनी, शाश्वत विकासाचे ध्येय साध्य करत शासन निर्णयानुसार सर्वसामान्यांना जलद गतीने सेवा देण्यासाठी सर्व यंत्रणेने कटिबद्ध राहावे, असे आवाहन केले आणि उपस्थितांचे आभार मानले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande