परभणी : आमदार विटेकरांना ऐकली शेतकऱ्यांची व्यथा
परभणी, 26 सप्टेंबर (हिं.स.)। परभणी जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर मानवत तालुक्यातील इंद्रायणी माळ, जंगमवाडी, मांडेवडगाव, पिंपळा, पाळोदी, खडकवाडी, नगर जवळा यासह परिसरातील गावांमध्ये आमदा
Q


परभणी, 26 सप्टेंबर (हिं.स.)। परभणी जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर मानवत तालुक्यातील इंद्रायणी माळ, जंगमवाडी, मांडेवडगाव, पिंपळा, पाळोदी, खडकवाडी, नगर जवळा यासह परिसरातील गावांमध्ये आमदार राजेश विटेकर यांनी दुष्काळी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकरी बांधवांशी मनमोकळा संवाद साधला. पिकांची झालेली अवस्था, पाण्याची उपलब्धता आणि शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेत त्यांच्या व्यथा समजून घेतल्या.

उभ्या पिकांकडे आशेने पाहणाऱ्या शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता आज जवळून पाहायला मिळाली. पाऊस लांबल्याने निर्माण झालेली परिस्थिती, पिकांचे नुकसान आणि पुढील हंगामाबाबतची चिंता यामुळे बळीराजा मोठ्या संकटातून जात आहे. या वेळी शेतकरी बांधवांशी संवाद साधताना त्यांच्या प्रत्येक अडचणीची गांभीर्याने दखल घेतली. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांचे दुःख समजून घेणे आणि त्यांच्या प्रश्नांसाठी शासनदरबारी आवाज उठवणे ही केवळ जबाबदारी नाही, तर माझे कर्तव्य आहे.या कठीण काळात “शेतकरी एकटा नाही, त्याच्या सुख-दुःखात मी सदैव सोबत आहे” हा विश्वास शेतकरी बांधवांना दिला. संकट कितीही मोठे असले तरी शासनाच्या माध्यमातून आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande