परभणी - जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत तनिष्का डापकरचे सुवर्ण यश
परभणी, 26 सप्टेंबर, (हिं.स.)। येथील नूतन विद्यामंदिर शिक्षण संस्था संचलित नूतन विद्यामंदिर मुला-मुलींचे हायस्कूल मधील इयत्ता ८ वी ‘अ’ वर्गातील विद्यार्थिनी कु. तनिष्का गोरखनाथ डापकर हिने जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत सुवर्णपदक
परभणी - जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत तनिष्का डापकरचे सुवर्ण यश


परभणी, 26 सप्टेंबर, (हिं.स.)।

येथील नूतन विद्यामंदिर शिक्षण संस्था संचलित नूतन विद्यामंदिर मुला-मुलींचे हायस्कूल मधील इयत्ता ८ वी ‘अ’ वर्गातील विद्यार्थिनी कु. तनिष्का गोरखनाथ डापकर हिने जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले आहे. तिने स्पर्धेतील सर्व साखळी सामने जिंकत आपल्या उत्कृष्ट खेळाचे दर्शन घडविले. या दमदार कामगिरीच्या जोरावर तिची विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

तनिष्काच्या या यशाबद्दल तिचे क्रीडा प्रशिक्षक डी. एम.मैड तसेच वर्गशिक्षक व्ही. जी. मोरे यांनी तिचे अभिनंदन केले.

तनिष्काने मिळविलेल्या या यशाबद्दल नूतन विद्यामंदिर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हेमंत जामकर , उपाध्यक्ष अँड. किरण सुभेदार , कोषाध्यक्ष डॉ. रत्नाकर सुभेदार, सचिव विजय जामकर यांनी तिचे कौतुक करून अभिनंदन केले. मुख्याध्यापक जी. एन. शिंदे , सर्व शिक्षकांनी तिचे अभिनंदन करून विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

तनिष्काच्या या यशामुळे प्रशालेच्या क्रीडा क्षेत्रातील लौकिकात भर पडली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande