भारताचे संयुक्त राष्ट्रांत शाहबाज शरीफ यांच्या भाषणाला सडेतोड प्रत्युत्तर
न्यूयॉर्क, 26 सप्टेंबर (हिं.स.) | पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी संयुक्त राष्ट्रांमधील आपल्या भाषणात भारताविषयी अनेक वक्तव्ये केली, ज्यावर भारताने प्रत्युत्तर दिले आहे. यावर प्रतिक्रिया म्हणून, संयुक्त राष्ट्रांमधील भारताच्या स्थायी मिशनच्
पेटल गेहलोत


न्यूयॉर्क, 26 सप्टेंबर (हिं.स.) | पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी संयुक्त राष्ट्रांमधील आपल्या भाषणात भारताविषयी अनेक वक्तव्ये केली, ज्यावर भारताने प्रत्युत्तर दिले आहे. यावर प्रतिक्रिया म्हणून, संयुक्त राष्ट्रांमधील भारताच्या स्थायी मिशनच्या प्रथम सचिव पेटल गेहलोत यांनी थेट पाकिस्तानवर निशाणा साधला. त्या म्हणाल्या, पाकिस्तानी प्रतिनिधीकडून काही विचित्र वक्तव्ये ऐकू आली. पण पाकिस्तान रात्री दहशतवादाबद्दल बोलतो आणि दिवसा सुरक्षेबद्दल. पेटल गेहलोत म्हणाल्या की, पाकिस्तानची ही वक्तव्ये अशा वेळी आली आहेत, जेव्हा न्यूयॉर्क शहर ९/११ च्या दहशतवादी हल्ल्यांच्या २५ व्या वर्षपूर्तीनिमित्त कार्यक्रम आयोजित करत आहे. या हल्ल्यांचा सूत्रधार ओसामा बिन लादेन एका पाकिस्तानी लष्करी अकादमीजवळ राहत होता. जो देश स्वतः दहशतवादाचा उगम आणि आश्रयदाता आहे, त्याने संयुक्त राष्ट्रांसारख्या प्रतिष्ठित मंचावर शांतता आणि सुरक्षेचा उपदेश करणे हास्यास्पद आहे.

काश्मीरवर सडेतोड प्रत्युत्तर

काश्मीर प्रश्नावर गेहलोत यांनी पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर दिले. त्या म्हणाल्या की, जम्मू आणि काश्मीर तसेच लडाख हे केंद्रशासित प्रदेश भारताचे अविभाज्य भाग आहेत आणि नेहमीच राहतील. जर पाकिस्तानला मानवाधिकार मुद्द्यांवर इतकीच उत्सुकता असेल, तर त्यांनी बेकायदेशीरपणे बळकावलेल्या जम्मू आणि काश्मीरकडे (PoK) पाहावे. जिथे, रावलकोटसह आसपासच्या परिसरात, पाकिस्तानी सैन्य दररोज नागरिकांवर अमानुष अत्याचार करते, मनमानी हत्या करते आणि मूलभूत हक्कांचे उल्लंघन करते. मानवाधिकारांवर चर्चा करण्यापूर्वी पाकिस्तानने या पैलूकडेही लक्ष दिले पाहिजे.

पाकिस्तानची व्यवस्था ईशनिंदा कायद्यावर आधारित

गेहलोत यांनी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या अल्पसंख्याकांबद्दलच्या वक्तव्यावरून पाकिस्तानवरही टीका केली. ते म्हणाले, आम्ही जे ऐकले ते कट्टरता आणि द्वेषाचा मोठा इतिहास असलेल्या लोकांकडून आले आहे. ते दिवसा सुरक्षेबद्दल बोलतात, पण प्रत्यक्षात रात्री दहशतवाद पसरवतात. या सभेला अशा सरकारने संबोधित केले, ज्यांची संपूर्ण कायदेशीर प्रणाली ईशनिंदा कायदे आणि त्यांच्या कट्टरतेवर आधारित आहे. त्या देशाला धार्मिक सहिष्णुतेवर चर्चा करण्याचा कोणताही अधिकार नाही. पाकिस्तानमध्ये हिंदू, शीख आणि ख्रिश्चन यांसारख्या अल्पसंख्याकांना कशी वागणूक दिली जाते, त्यांना कशी अमानवीय आणि क्रूर वागणूक दिली जाते, हे जगाला माहीत आहे.

लष्कराकडून चालवला जातो पाकिस्तानचा कारभार

ज्या सरकारची राजधानी सध्या स्वतःच्याच लोकांविरुद्ध अधिक मजबूत केली जात आहे, त्या सरकारकडून आम्ही लोकशाही हक्क आणि मानवी मूल्यांविषयी काही ढोंगीपणाचे बोलणे ऐकले आहे, असे पेटल गेहलोत म्हणाल्या. राष्ट्राध्यक्ष महोदय, हे घडत आहे कारण हे सरकार लष्कराचे, लष्कराद्वारे चालवले जाणारे आणि लष्करासाठीच आहे. त्यांचे कठपुतळी नेते येतील आणि जातील, पण खरे निर्णय कोण घेते याबद्दल आपण कोणताही भ्रम बाळगता कामा नये. पाकिस्तानचे वास्तव त्याच्या २७ व्या घटनादुरुस्तीमध्ये आणि त्याच्या खऱ्या शासकाला दिलेल्या आजीवन संरक्षणामध्ये स्पष्टपणे दिसून येते.

पेटल गेहलोत यांनी आपल्या भाषणाचा समारोप करताना म्हटले, भारत दहशतवाद आणि अणुबॉम्बच्या धमकीपुढे कधीही झुकणार नाही. पाकिस्तान आपल्याच भूमीवर दहशतवादी तळ चालवतो; त्यांनी आधी ते तळ बंद केले पाहिजेत. भारताचे दहशतवादाविरोधात 'शून्य सहनशीलता' धोरण आहे, आणि म्हणूनच, सीमेपलीकडे होणाऱ्या कोणत्याही कारवाईचे परिणाम पाकिस्तानलाच भोगावे लागतील.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande