नेपाळमध्ये पूर आणि दरडी कोसळल्याने २१ जणांचा मृत्यू
काठमांडू, 28 सप्टेंबर (हिं.स.)।नेपाळमध्ये गेल्या काही दिवसांत पूर, भूस्खलन आणि वीज कोसळण्याच्या घटनांमध्ये किमान २१ जणांचा मृत्यू झाला आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सतत होत असलेल्या पावसामुळे अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली. त्यामुळे अनेक घरा
नेपाळमध्ये पूर आणि दरडी कोसळल्याने २१ जणांचा मृत्यू


काठमांडू, 28 सप्टेंबर (हिं.स.)।नेपाळमध्ये गेल्या काही दिवसांत पूर, भूस्खलन आणि वीज कोसळण्याच्या घटनांमध्ये किमान २१ जणांचा मृत्यू झाला आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सतत होत असलेल्या पावसामुळे अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली. त्यामुळे अनेक घरांचे नुकसान झाले असून, रस्ते वाहतूकही मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे. गेल्या महिन्यात आलेल्या विनाशकारी पुरातून हिमालयीन देश अद्याप पूर्णपणे सावरलेला नसतानाच ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या पुरात किमान १,४५३ जणांचा मृत्यू झाला होता, तर ५,००० हून अधिक लोक अद्याप बेपत्ता आहेत.

शनिवारी रात्री पाल्पा जिल्ह्यातील माथागढी येथे भूस्खलनामुळे एक घर मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला. देशात गेल्या चार दिवसांत पूर, भूस्खलन आणि वीज कोसळण्याच्या घटनांमध्ये १६ जणांचा मृत्यू झाला असून, त्यामुळे मृतांचा एकूण आकडा २१ वर पोहोचला आहे. याच कालावधीत बचाव पथकांनी पूर आणि भूस्खलनामुळे प्रभावित झालेल्या १,२८४ जणांची सुटका केली.

दरम्यान, नेपाळच्या अधिकाऱ्यांनी दक्षिणेकडील चितवन आणि नवलपरासी जिल्ह्यांतील काही भागांसाठी पुराचा विशेष इशारा जारी केला आहे. या भागांत नारायणी नदी धोक्याच्या पातळीपेक्षा वरून वाहत असून, तिच्या पाण्याची पातळी सातत्याने वाढत आहे. भारतात गंडक नदी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या नदीला पूर आल्यास त्याचा परिणाम शेजारील भारतावरही होण्याची शक्यता आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande