
अमरावती, 28 सप्टेंबर (हिं.स.)। शेतात बांधलेली जनावरे चोरणाऱ्या टोळीचा ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केलाआहे. मोर्शी ठाण्याच्या हद्दीत झालेल्या जनावरांच्या चोरीप्रकरणी पोलिसांनी ५ आरोपींना अटक केली आहे.
आरोपींजवळून रोख रक्कम, चार मोबाईल आणि चोरीसाठी वापरलेले बोलेरो पिकअप वाहन यासह एकूण ६ लाख ९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ११ मे २०२६ लागजाननसोनुलेयांनी मोर्शी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यांच्या मौजा पाळा शेतात बनविलेल्या वाड्यात एकूण १२ म्हशी बांधलेल्या होत्या. अज्ञात चोरांनी यातील ७ म्हशी, एक बैल चोरुन नेला होता.
या प्रकरणाचा तपास ग्रामीण स्थानिक गुन्हेशाखेकडून केला जात होता. २७सप्टेंबरला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, पोलिसांनी अमरावतीच्या यास्मीननगर येथील रहिवासी अब्दुल आवेज अब्दुल अनिस (25) आणित्यांच्या साथीदाराला ताब्यात घेतले. चौकशीतत्यांनी आपला गुन्हा कबुल केला. पोलिसांनी त्यांच्या साथीदारांना मोर्शी, राणीपूर, मध्यप्रदेशातून ताब्यात घेतले. आरोपींनी चोरी केलेली जनावरे अर्जुन बलदेव पठारिया यांच्या माध्यमाने मध्य प्रदेशच्या भानपूर, भोपाळ स्थित बैलबाजारात बिना पावतीने विकले. मिळालेली १ लाखाची रक्कम आरोपींनी वाटून घेतली. आरोपींजवळून ७५ हजार रुपये रोख, चार मोबाईल फोन तसेच गुन्हयात वापरलेले बोलेरो पिक अप वाहन पोलिसांनी जप्त केले. अटक केलेल्या आरोपींमध्य अब्दुल आवेज अब्दुल अनिस (25, यास्मिननगर, अमरावती), अब्दुलशाकीर अब्दुलसाबीर (34), शेखनईमशेखरहीम (40), जमीर खान साबीर खान (34), अर्जुन बलदेव पठारिया (25) यांचा समावेश आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी