धुळे - गोळीबार प्रकरणी दोघांना अटक, गावठी कटट्यासह काडतूस जप्त
धुळे, 28 सप्टेंबर (हिं.स.) दुकानाचा गाळा घेण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून चायनिज स्टॉल चालकाला जिवे मारण्याच्या उद्देशाने गावठी कट२ट्यातून गोळीबार केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने दोन संशयितांना अटक करून त्यांच्याकडून गावठी कट्टा, मॅगझीन आण
धुळे - गोळीबार प्रकरणी दोघांना अटक, गावठी कटट्यासह काडतूस जप्त


धुळे, 28 सप्टेंबर (हिं.स.) दुकानाचा गाळा घेण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून चायनिज स्टॉल चालकाला जिवे मारण्याच्या उद्देशाने गावठी कट२ट्यातून गोळीबार केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने दोन संशयितांना अटक करून त्यांच्याकडून गावठी कट्टा, मॅगझीन आणि जिवंत काडतूस असा ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणातील अन्य सहा आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही घटना २७ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान धुळे शहरातील मनोहर टॉकीजजवळ नाटेश्वर इलेक्ट्रिक दुकानासमोरील चायनिज स्टॉलवर घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार, हर्षल दीपक गवळी हा स्टॉलवर व्यवसाय करत असताना दुकानाचा गाळा घेण्याच्या कारणावरून हल्लेखोरांनी त्याच्यासह त्याच्या भावाशी वाद घालत शिवीगाळ केली. त्यानंतर हाताबुक्क्यांनी मारहाण करून दहशत निर्माण केली आणि हर्षल गवळी तसेच त्याच्या भावाला जिवे मारण्याच्या उद्देशाने गावठी कटट्यातून गोळीबार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी वैभव मेकले, भावेश कौलस्कर, ऋषिकेश मोरे, भुषण लोधी, नकुल रगडे, विवेक गवळी, प्रथमेश भोंडवे आणि पंकज मेकले (सर्व रा. धुळे) यांच्याविरुद्ध धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४२७/२०२६ दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १०९, १८९(२), १९०, १९१(२), १९१(३), ३५२, ३५१(२)(३) तसेच शस्त्र अधिनियमाच्या ३/२५ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, धुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे तसेच आझादनगर आणि चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यांच्या अधिकार्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची सूत्रे हाती घेतली. शहरातील अत्यंत वर्दळीच्या भागात भरदिवसा झालेल्या या गोळीबारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिक आणि व्यापार्यांनी जीव वाचविण्यासाठी धावाधाव केल्याचेही पोलिसांनी नमूद केले आहे. तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वैभव ऊर्फ गोलू संजय मेकले (२४, रा. अमरनगर, मनोहर टॉकीज मागे, धुळे) आणि भुपेश ऊर्फ भुषण तिलकसिंग लोधी (२३, रा. अमरनगर, मनोहर टॉकीज मागे, धुळे) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेला मॅगझीनसह देशी गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले.

जप्त मुद्देमालामध्ये ४० हजार रुपयांचा गावठी कट्टा आणि एक हजार रुपयांचे जिवंत काडतूस असा एकूण ४१ हजार रुपयांचा ऐवज आहे. अटक केलेल्या दोन्ही आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी धुळे शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून उर्वरित सहा आरोपींचा शोध सुरू आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक आरोपी वैभव ऊर्फ गोलू संजय मेकले याच्याविरुद्ध यापूर्वी आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. तसेच आरोपी भावेश अनिल कौलस्कर ( २२, रा. ग. नं. ५/६ ची बोळ, माधवपुरा, धुळे) याच्याविरुद्धही आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande