
बीड, 28 सप्टेंबर (हिं.स.)आष्टी तालुक्यातील पिंपरी घाट शिवारात आढळलेल्या अनोळखी तरुणाच्या खुनाचा अंभोरा पोलिसांनी अवघ्या काही तासांत छडा लावला. या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयित आरोपींना जेरबंद केले आहे. कोणताही ठोस धागा हाती नसताना पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, मोबाईल लोकेशन, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली. त्यानंतर संशयितांपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रांत हिंगे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. अंभोरा पोलिसांच्या तत्पर तपासामुळे खुनाच्या घटनेचा काही तासांत उलगडा झाल्याचे समोर आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis