आशियाई क्रीडा स्पर्धा : पुरुषांच्या १५०० मीटर शर्यतीत गुलवीर सिंगला रौप्य पदक
नागोया (जपान), 28 सप्टेंबर (हिं.स.)आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारतीय खेळाडू गुलवीर सिंगने पुरुषांच्या १५०० मीटर शर्यतीत रौप्य पदक जिंकले. अंतिम फेरीत त्याने ३:३६.७२ अशी स्वतःची सर्वोत्तम वेळ नोंदवली. १२ खेळाडूंच्या अंतिम शर्यतीत गुलवीर सुरुव
गुलवीर सिंग


नागोया (जपान), 28 सप्टेंबर (हिं.स.)आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारतीय खेळाडू गुलवीर सिंगने पुरुषांच्या १५०० मीटर शर्यतीत रौप्य पदक जिंकले. अंतिम फेरीत त्याने ३:३६.७२ अशी स्वतःची सर्वोत्तम वेळ नोंदवली. १२ खेळाडूंच्या अंतिम शर्यतीत गुलवीर सुरुवातीपासूनच शर्यतीत टिकून राहिला आणि शेवटच्या फेरीत जोरदार मुसंडी मारत त्याने रौप्यपदक निश्चित केले.जपानच्या काझुतो इझावाने ३:३६.३५ अशी स्पर्धेतील विक्रमी वेळ नोंदवत सुवर्णपदक जिंकले, तर जपानचाच दुसरा खेळाडू नागिया मोरी याने ३:३७.९२ वेळेसह कांस्यपदक पटकावले.

गुलवीरने इझावाच्या 'गेम्स रेकॉर्ड' वेळेपेक्षा केवळ ०.३७ सेकंद उशिरा शर्यत पूर्ण केली, मात्र मोरीपेक्षा तो एका सेकंदापेक्षा जास्त फरकाने पुढे राहून रौप्यप दकाचा मानकरी ठरला. आणखी एक भारतीय खेळाडू, युनूस शाह, ३:४३.८८ वेळेसह अंतिम फेरीत नवव्या स्थानावर राहिला.

आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुषांच्या १५०० मीटर प्रकारात गुलवीरचे हे रौप्यप दक भारतासाठी सुधारणा दर्शवणारे ठरले आहे; कारण मागील आवृत्तीत भारताने या प्रकारात कांस्यपदक जिंकले होते.३:३६.७२ ही वेळ गुलवीरसाठी वैयक्तिक सर्वोत्तम वेळ ठरली. सर्वात मोठ्या मंचावर कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करत त्याने पदक विजेत्यांच्या यादीत आपले स्थान निश्चित केले.

या निकालामुळे आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या ॲथलेटिक्स पदकांच्या संख्येत आणखी एका पदकाची भर पडली; जपानी जोडीविरुद्धच्या जोरदार कामगिरीनंतर गुलवीरने पदक विजेत्यांचे व्यासपीठ गाठले. विशेष म्हणजे, आयची-नागोया आशियाई क्रीडा स्पर्धेतील गुलवीर सिंगचे हे दुसरे रौप्यपदक आहे. याआधी शुक्रवारी, पुरुषांच्या १०,००० मीटर शर्यतीत त्याने २८:२९.३८ अशी वेळ नोंदवत रौप्य पदक जिंकले होते. या शर्यतीत बहरीनच्या बिरहानु बालेवने २८:२७.५१ अशी वेळ घेत सुवर्णपदक पटकावले.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande