दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरकारकडे आग्रही, प्रसंगी रस्त्यावर उतरून संघर्ष करू - शरद पवार
* शेतकऱ्यांमध्ये जनजागृती होणे गरजेचे मुंबई, 28 सप्टेंबर (हिं.स.) - आम्ही अडीच तास एकत्र बसलो आहोत. मला अनेक वेगवेगळ्या मागण्या दुष्काळाचा निमित्ताने ऐकायला मिळाल्या. प्रांताध्यक्ष यांनी सूचना दिल्यानुसार आपण काय निवेदन आंदोलन करताना द्यायच्या आहे
शरद पवार


* शेतकऱ्यांमध्ये जनजागृती होणे गरजेचे

मुंबई, 28 सप्टेंबर (हिं.स.) - आम्ही अडीच तास एकत्र बसलो आहोत. मला अनेक वेगवेगळ्या मागण्या दुष्काळाचा निमित्ताने ऐकायला मिळाल्या. प्रांताध्यक्ष यांनी सूचना दिल्यानुसार आपण काय निवेदन आंदोलन करताना द्यायच्या आहेत, हे सांगितलं आहे. रविवारी कोअर कमिटी बैठक आम्ही घेतली. राज्य सरकारने काय काय देणे अपेक्षित आहे त्याचे निवेदन दिलं आहे. आम्ही दोन चार दिवसांत सरकारकडे याबाबत आग्रह करू. आपल्याला भांडण करायचं नाही जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर रस्त्यावर उतरून संघर्ष करु, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी येथे संवाद साधताना म्हटले आहे. याशिवाय महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण नागरिकांना तातडीचा दिलासा मिळावा, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे १७ मागण्या करण्यात आल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची बैठक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पार पडली आहे, या बैठकीत सध्या राज्यातील स्थिती तसेच दुष्काळ निवारणासाठी काय काय करता येईल, यावर चर्चा झाली. याच बैठकीत उपस्थितांना शरद पवार यांनी संबोधित केले आहे, या बैठकीला पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, विधिमंडळ गटनेते व आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री अनिल देशमुख, प्रदेश सरचिटणीस व आमदार रोहित पवार व इतर नेत्यांनी, जाणकारांनी आपले विचार मांडले, तसेच राजेश टोपे, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी, सर्व सेलचे प्रमुख, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपथित होते.

शरद पवार बोलताना म्हणाले की, दुष्काळाच्या निमित्ताने सरकारने तुमचे हात बळकट करणे गरजेचे आहेत. दुष्काळाच्या निमित्ताने काही निर्णय राज्यात होत असले तरी केंद्रात देखील काही निर्णय होत असतात. मी केंद्रीय मंत्रिमंडळात होतो त्यावेळी पंतप्रधान म्हणून मनमोहन सिंग यांनी बैठक बोलावली होती. त्यावेळी त्यांनी बैठकीत सांगितलं होतं दुष्काळात काय निर्णय घ्यायचे याचे सर्वाधिकार खासदारांना द्या. मंत्रिमंडळ संमती न घेता ते अधिकार द्या. त्यावेळी मी जालना जिल्ह्यात गेलो होतो त्यावेळी राजेश टोपे होते त्यांनी सांगितलं होतं, मोसंबी बागा मोठ्या प्रमाणात आहेत. त्यावेळी एक गोष्ट कळली होती, मोसंबीला कधीही मदत मिळाली नव्हती. त्यावेळी मी दिल्लीत गेल्यावर निर्णय घेतला की मोसंबी पिकाला 25 हजार रुपये मदत देण्याचे जाहीर केले. तुम्ही थकबाकीदार असाल तर नवीन कर्ज तुम्हाला मिळणार नाही. याबाबत शेतकऱ्यांमधे जनजागृती होणे गरजेचे आहे. 265 तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केले आहेत. बाकी जिल्हे त्यात नाहीत. केळी पिकाला मदत नाही. याबाबत नोंद घेणे गरजेचे आहे,असे शरद पवार यांनी बोलताना सांगितले.

शरद पवार म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये एआय शिकवण्यासाठी पहिली संस्था बारामतीत स्थापन केली आहे. नुकताच त्या संस्थेत गेलो होतो दारातून आत गेलो तेव्हा दोन रोबोटनी मला सॅल्यूट मारला. त्यांनी अनेक गोष्टी मला करून दाखवल्या. जगात अनेक प्रश्न कृत्रिम बुद्धिमत्ता सोडवू शकेल. त्यामुळे ते शिकायला लागेल किमान आपण तो विषय समजून घ्यायला हवे, असे शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं निवडणुक प्रक्रियेत काय होतं आहे. भविष्यात एआय किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता संबंधित साधणं निवडणुकीत वापरली जातील. त्यामुळे मी अध्यक्षांना याबाबत सांगितलं आहे. आपल्यालादेखील याबाबत काहीतरी करावं लागेल. माझ सांगणं आहे की, याबाबत छापून येणारे लेख वाचा समजून घ्या. आपल्याला हे समजून घ्यायची मानसिकता करावी लागेल,असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.

यावर सविस्तर बोलताना शरद पवार म्हणाले की,आपल्याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. हो, चर्चा सुरू आहे. मला त्यांना सांगायच आहे. आपण कुठेही जाणार नाही. आम्ही कुणासोबत जाणार नाही. यायचं असेल तर आमच्यासोबत या,असे शरद पवार म्हणाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande