मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणीसाठी महाराष्ट्रासह देशभरात जोरदार निदर्शने
नवी दिल्ली, 28 सप्टेंबर (हिं.स.) - मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांमध्ये सोमवारी निदर्शने करण्यात येत आहेत. यामध्ये दिल्ली, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, हरियाणा, छत
निदर्शने


निदर्शने


नवी दिल्ली, 28 सप्टेंबर (हिं.स.) - मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांमध्ये सोमवारी निदर्शने करण्यात येत आहेत. यामध्ये दिल्ली, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, हरियाणा, छत्तीसगड आणि उत्तराखंड आदी राज्यांतील काँग्रेस कार्यकर्त्यांनी सहभागी होत निदर्शने केली.

महाराष्ट्रातही धुळे, कोल्हापूर, अमरावती, परभणी, लातूरसह अनेक जिल्ह्यांत काॅंग्रेसकडून जोरदार निदर्शने करत जिल्हाधिकारी तथा स्थानिक प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

दरम्यान निवडणूक आयोगाच्या कामकाजावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मंगळवारी काँग्रेस कार्यकारिणी समितीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत निवडणूक आयोगाशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा होईल आणि पक्षाच्या भविष्यातील रणनीतीवर विचार केला जाईल. पत्रकारांशी बोलताना मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, काँग्रेस हा मुद्दा गांभीर्याने हाताळेल आणि काँग्रेस कार्यकारिणी समितीचे सर्व सदस्य आपल्या सूचना सादर करतील. हा मुद्दा केवळ एका राजकीय पक्षापुरता मर्यादित नाही, तर तो देशाच्या लोकशाही आणि संविधानाच्या संरक्षणाशी संबंधित आहे. ते म्हणाले की, काँग्रेस हा मुद्दा गांभीर्याने घेत असून काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या बैठकीत भविष्यातील रणनीती तयार केली जाईल.

निवडणूक आयोगाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना काँग्रेस अध्यक्षांनी आरोप केला की, पक्षाच्याच सदस्यांनी त्याच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी केरळचे माजी मुख्य सचिव जी. जी. थॉमसन यांच्या दाव्याचा हवाला दिला, ज्यांनी म्हटले होते की २०१६ मध्ये, तत्कालीन आयएएस अधिकारी ज्ञानेश कुमार यांनी त्यांना २०१९ ची लोकसभा निवडणूक भाजपच्या तिकिटावर लढवण्याचा सल्ला दिला होता. थॉमसन यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी हा सल्ला स्वीकारला नाही.

उत्तर प्रदेशातील आग्रा येथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी ज्ञानेश कुमार यांच्या घरावर काळी शाई फासली आणि लिहिले - ‘ज्ञानेश कुमार गद्दार, मत चोर’. राजस्थानच्या जयपूरमध्ये शहीद स्मारक येथे सभा झाल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत पायी मोर्चा काढला. पोलिसांनी बॅरिकेडिंग करून काँग्रेस कार्यकर्त्यांना रोखले. पोलिसांनी माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गोविंद सिंह डोटासरा यांच्यासह कार्यकर्त्यांवर वॉटर कॅननचा वापर केला.

मध्य प्रदेशात मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरावलोकनाच्या (SIR) विरोधात भोपाळमध्ये काँग्रेसचे आंदोलन करण्यात आले. प्रदेश काँग्रेस अध्यक्ष जीतू पटवारी यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाला घेराव घालण्यासाठी पोहोचले आहेत. यादरम्यान पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली. काही कार्यकर्ते बॅरिकेड्सवरही चढले.

हरियाणा आणि बिहारमधील अनेक जिल्ह्यांत काँग्रेसकडून आक्रोश मोर्चा काढण्यात आला. दोन्ही राज्यांत सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी घेराव घातला. याच पार्श्वभूमीवर दुर्गमध्ये काँग्रेसने काळे कपडे परिधान करून रॅली काढली.

उत्तराखंडमधील 8 जिल्ह्यांत मतचोरी विरोधात काँग्रेसने आंदोलन केले. डेहराडून, नैनीताल, हल्द्वानी, टिहरी, बागेश्वर, रुडकी, रुद्रपूर, उत्तरकाशी आणि पिथौरागढ येथे काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरून जोरदार विरोध दर्शवला.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande