बीड - वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा
बीड, 29 सप्टेंबर, (हिं.स.)। बीडच्या माजलगाव तालुक्यातील लोणगाव (गोदावरी तांडा) येथील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या कथित वेश्या व्यवसायावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने छापा टाकला. डमी ग्राहकाच्या माध्यमातून खात्री करून केलेल्या कारवाईत एका प
पोलीस कारवाई


बीड, 29 सप्टेंबर, (हिं.स.)। बीडच्या माजलगाव तालुक्यातील लोणगाव (गोदावरी तांडा) येथील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या कथित वेश्या व्यवसायावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने छापा टाकला. डमी ग्राहकाच्या माध्यमातून खात्री करून केलेल्या कारवाईत एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली. याप्रकरणी तिघांविरुद्ध दिंड्रूड पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, रोख रक्कम आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande