
मालेगाव, 29 सप्टेंबर (हिं.स.)। साडेचार वर्षीय बालिकेवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील हत्या प्रकरणात संबंधित आरोपीचे घर निकाल लागण्यापूर्वी ग्रामस्थांनी काढून टाकल्याची घटना घडली आहे.
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे साडेचार वर्षीय बालिकेवरची लैंगिक अत्याचार करून हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. यातील आरोपी विजय खेळणार याच्या वरती पोस्को न्यायालयात खटला सुरू आहे. या खटल्याचा निकाल आज बुधवारी येणार असून त्यापूर्वीच गावातील अज्ञात नागरिकांनी त्याचे घर पाडल्याची घटना घडली आहे. याबाबत तालुका पोलीस ठाण्यामध्ये पुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक शेगर हे अधिक तपास करीत आहे हे घर 11 महिन्यापासून बंद होते असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI