पेंटाकल कंसल्टंट्स (आय) लिमिटेडने आयपीओसाठी सेबीकडे दाखल केला डीआरएचपी
मुंबई, 30 सप्टेंबर (हिं.स.)। मुंबईस्थित पेंटाकल कंसल्टंट्स (आय) लिमिटेडने आपल्या आरंभिक सार्वजनिक निर्गमाद्वारे (आयपीओ) निधी उभारण्यासाठी भांडवली बाजार नियामक भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळाकडे (सेबी) ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (डीआरएचपी) दा
Pentacle Consultants Limited files DHRP IPO


मुंबई, 30 सप्टेंबर (हिं.स.)। मुंबईस्थित पेंटाकल कंसल्टंट्स (आय) लिमिटेडने आपल्या आरंभिक सार्वजनिक निर्गमाद्वारे (आयपीओ) निधी उभारण्यासाठी भांडवली बाजार नियामक भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळाकडे (सेबी) ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (डीआरएचपी) दाखल केला आहे.

सेबीकडे जमा केलेल्या मसुदा दस्तऐवजानुसार, पेंटाकल कंसल्टंट्स (आय) लिमिटेडच्या १० रुपये दर्शनी मूल्याच्या या आयपीओमध्ये १०६.६९ कोटी रुपयांपर्यंतचा फ्रेश इश्यू आणि प्रवर्तक पल्लवी महेंद्र मोरे यांच्याकडून २१,२५,००० इक्विटी शेअर्सपर्यंतचा ऑफर-फॉर-सेलचा समावेश आहे.

कंपनी या फ्रेश इश्यूमधून मिळणाऱ्या २२.१६ कोटी रुपयांच्या रकमेचा वापर सेगमेंटल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट लिमिटेड (एसआयडीएल)च्या प्रस्तावित अधिग्रहणासाठी कॅश पेमेंट करण्यासाठी करणार आहे. तर ६.५ कोटी रुपयांचा वापर कंपनीने घेतलेले काही थकीत कर्ज पूर्णपणे किंवा अंशतः फेडण्यासाठी किंवा प्री-पेमेंट करण्यासाठी केला जाणार आहे. याशिवाय, १९.९३ कोटी रुपयांचा वापर वर्किंग कॅपिटलच्या अतिरिक्त गरजा पूर्ण करण्यासाठी केला जाईल. उर्वरित रकमेचा वापर अज्ञात अधिग्रहणांच्या माध्यमातून इनऑर्गेनिक ग्रोथ, सामान्य कॉर्पोरेट उद्देश आणि ऑफरशी संबंधित खर्चांसाठी केला जाणार आहे.

पेंटाकल कंसल्टंट्स (आय) लिमिटेडचा हा ऑफर बुक-बिल्डिंग प्रोसेसद्वारे आणला जात आहे. यामध्ये नेट ऑफरच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त हिस्सा पात्र संस्थात्मक खरेदीदारांना दिला जाणार नाही. तसेच नेट ऑफरचा किमान १५ टक्के आणि ३५ टक्के हिस्सा अनुक्रमे नॉन-इन्स्टिट्युशनल बोलीदार आणि रिटेल वैयक्तिक बोलीदारांसाठी राखीव असेल.

उल्लेखनीय म्हणजे, २००६ मध्ये स्थापन झालेली ही कंपनी ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर कन्सल्टिंग आणि इंजिनिअरिंग एडव्हायजरी क्षेत्रात कार्यरत आहे. मुंबईस्थित ही कंपनी भारत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये डिझाइन इंजिनिअरिंग, प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी आणि विशेष एडव्हायजरी सेवा प्रदान करते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande